जागा रे गोपाळांनो रामनामी जागा।
कळिकाळ आकळा महादोष जाती भंगा ॥१॥
सहस्त्रदळ समान अनुहत ध्वनि उठी।
नामाचेनि बळें पापे रिघालीं कपाटीं ॥२॥
दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन।
एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण ॥३॥
द्वादशी साधन कोटीकुळे उध्दरती।
नामा म्हणे केशव ठाव देईल वैंकुठी ॥४॥
दशमी व्रताचा आरंभु ।
दिंडी कीर्तन करा समरंभु।
तेणें तो स्वयंभु । संतोष पावे ॥१॥
एकादशी जागरण.
हरिपूजन नामकीर्तन ।
द्वादशी क्षीरापती जाण ।
वैष्णव जन सेविती ॥२॥
असे व्रत तीन दिवस।
करी जो आदरें पूर्ण ।
एकाजनार्दनी ।
तया नाहीं सर्वथा ॥३॥
पंढरा दिवस एकादशी ।
कां रे न करिसी व्रतसार ॥ १ ॥
काय तुझा जीव एका दिसें ।
फराळाच्या मिसें धनी घेसी ॥२॥
स्वहित कारण मानवेल जन।
हरिकथा पूजन वैष्णवांचें ॥३॥
कमाल तुज होती उजगरे ।
देउळासी कां रे मरसी जाता ॥४॥
तुका म्हणे कां रे सुकुमारसी ।
काय जब देसी यमदूत ॥५॥
एकादशीस अन्नपान ।
जे नर करिती भोजन ।
श्वानविष्ठे समान।
अधम जन तें एक ॥१॥
ऐका व्रताचें महिमान ।
नेमें आचरती जन ।
गाती ऐकती हरिकर्तन ।
तें समान विष्णूशीं ॥२॥
अशुद्ध विटाळशीचे खळ ।
विडा भक्तां तांबूल ।
सापडे सबळ.
कालाहातीं न सुटे ॥३॥
शेज बाज विलास भोग.
करिती कामिनीचा संग ।
तया जोडे क्षयरोग ।
जन्माधी बलिवंत ॥४॥
आपण न वजे हरिकर्तना ।
आणिकां वारी जातां कोणा ।
त्याच्या पापें जाणा ।
ठेंगणा तो महामेरू ॥५॥
तया दंडी यमदूत।
दोन तयांचे अंकित.
तुका म्हणे व्रत ।
एकादशी चुकलिया ॥६॥
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?