#01
त श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अनुभवता यावा यासाठी पुणे पोलिसांनी खास लाइव्ह पालखी ट्रॅकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुणे शहरात पालखीचे आगमन झाल्यापासून ते प्रस्थानापर्यंतची संपूर्ण माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी खास वेबपेज तयार केले आहे. त्या वेबपेजच्या साहाय्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना मोबाइल, लॅपटॉपद्वारे एका क्लीकवर पालखीच्या सर्व अपडेट मिळणार आहेत.
पुणे पोलिसांनी तयार केलेल्या वेबपेज diversion.punepolice.gov.in या लिंकवर क्लिक करून नागरिक पालखी सोहळा व वाहतूक बदलाची माहिती घेऊ शकतात. पालखी प्रस्थानादरम्यान होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी या वेबपेजचा उपयोग होईल, असे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. या वेबपेजद्वारे नागरिकांना वाहतुकीसाठी खुले असलेले रस्ते, पालखीचा मुक्काम याची माहिती मिळणार आहे.
0 Comments
मी आपली काय मदत करू शकतो ?